Ladki Bahin Yojana eKYC 2026

Ladki Bahin Yojana eKYC पुन्हा सुरू — 31 मार्चपर्यंत मुदत

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप eKYC पूर्ण केलेले नाही, त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, eKYC न केलेल्या लाभार्थ्यांचे पुढील हप्ते थांबू शकतात. त्यामुळे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी eKYC करणे अत्यंत महत्वाचे आहे.


eKYC का आवश्यक आहे?

  • लाभार्थीची ओळख पडताळणी करण्यासाठी
  • DBT (Direct Benefit Transfer) सुरळीत ठेवण्यासाठी
  • फसवणूक व डुप्लिकेट अर्ज टाळण्यासाठी
  • Payment Pending / Hold टाळण्यासाठी

लाडकी बहीण योजना – पात्रता, अपात्रता व अर्ज प्रक्रिया (Complete Details)

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. खाली या योजनेची अधिकृत पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर दिली आहे.


पात्रता (Eligibility Criteria)

या योजनेसाठी अर्ज करणारी महिला खालील अटी पूर्ण करणारी असावी:

  1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला पात्र आहे.
  3. अर्जदाराचे किमान वय 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वय 65 वर्षांपर्यंत असावे.
  4. लाभार्थीच्या नावावर आधार लिंक असलेले स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

अपात्रता (Ineligibility Criteria)

खालील परिस्थितीत महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकते:

  1. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा अधिक असल्यास.
  2. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता (Income Tax Payer) असल्यास.
  3. कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/स्थानिक संस्था येथे नियमित कर्मचारी असल्यास किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असल्यास.
    • (तथापि, ₹2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी/स्वयंसेवी/बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी पात्र ठरू शकतात.)
  4. अर्जदार महिला इतर सरकारी योजनेतून दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत असल्यास.
  5. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार असल्यास.
  6. कुटुंबातील सदस्य सरकारी बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असल्यास.
  7. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत असल्यास.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

ज्या महिलांना स्वतः ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी सरकारने मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अर्ज कुठे करावा?

मुख्यमंत्री लाडकी बहीण eKYC

अर्जदार महिला खालील ठिकाणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरू शकतात:

  • अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका
  • सेतु सुविधा केंद्र
  • ग्रामसेवक
  • CRP (समूह संसाधन व्यक्ती)
  • आशा सेविका
  • वार्ड अधिकारी
  • CMM (City Mission Manager)
  • मनपा बालवाडी सेविका
  • मदत कक्ष प्रमुख
  • आपले सरकार सेवा केंद्र

महत्वाचे: या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


अर्ज भरताना घ्यावयाची काळजी

  • अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक व पत्ता आधारकार्डप्रमाणे अचूक भरावा.
  • बँक खाते तपशील (Account Number, IFSC) योग्य भरावा.
  • मोबाईल नंबर Active व योग्य असावा.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज Reject होऊ शकतो.

स्त्रोत: महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन


मुख्यमंत्री लाडकी बहीण eKYC

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *